Pimpri : अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी पाच गुंठे जागा देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला (Pimpri) पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी परिसरातच पाच गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मल्हार आर्मीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिपक भोजने यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात भोजने यांनी म्हटले आहे की, मोरवाडी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उघड्यावर पुतळा होता. माजी नगरसेविका आशा शेंडगे, सुभद्रा ठोंबरे, उपअभियंता विजय भोजने, पालिका प्रशासन यांच्या पुढाकाराने मेघडंबरी उभारून पुतळा हलविण्यात आला. या स्मारकाच्या ठिकाणी 2015 पासून दर रविवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. स्मारक परिसराची स्वच्छता करून अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात.

Kothrud : समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या आठ खंडाचे सरसंघचालकांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन

या स्मारकाची (Pimpri) जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे स्मारकासाठी पुतळा परिसरातच चार ते पाच गुंठा जागा द्यावी, अशी मागणी दिपक भोजने, गणेश एकल, गोरख खामगळ, दत्ता शेंडगे, जयपाल दगडे, भिवाजी शिंगटे, अजित चौगुले, विजय महानवर, गोरख बंडगर, अच्युत लेंगरे, धनंजय गाडे, विनोद बरकडे, अवधूत वायकुळे, अनिल लंभाते, निलेश वाघमोडे आदींनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.