Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.

डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव राजेंद्र तळेले (वय 25, रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी गौरव याने फिर्यादी डॉ. तुषार यांचा विश्‍वास संपादन केला. यामुळे फिर्यादी यांनी वेगवेगळ्या कंपनीचे नऊ मोबाईल हॅन्डसेंट, दोन पिठाच्या गिरणी, फ्रिज व प्रिंटर आणण्यासाठी आरोपीला एक लाख एक हजार 700 रुपये दोन वेगवेगळ्या बॅंकेच्या खात्यावर ट्रान्सफर केले. मात्र, आरोपीने साहित्य किंवा पैसे परत न देता फसवणूक केली. याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर चव्हाण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.