Pimpri : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून विवाहितेला वारंवार मारहाण करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल महादेव शिंदे (वय 30), संगीता महादेव शिंदे (वय 50), महादेव विश्वनाथ शिंदे (वय 55), भगवान शिंदे, सुशील शिंदे, रेश्मा शिंदे (सर्व रा. ससाणे चाळ, विठ्ठल नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2015 ते 11 मे 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी महिलेला घरातील किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. वडिलांकडून घर बांधण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्यास विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी महिलेला दोन मुलांसह घरातून हाकलून दिले. परत घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.