Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात धुळीचे थैमान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीने थैमान घातले. या धुळीचे लोट वातावरणात बऱ्याच उंचीपर्यंत पसरले होते. दुपारपर्यंत शांत असलेले शहर पाच वाजण्याच्या सुमारास धुळीने व्यापले.

शुक्रवारी (दि. 7) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास शहरात वादळ सुटले. यामुळे जमिनीवरील धुळ वातावरणात मिसळली. हवेत उंच पर्यंत धुळीचे लोट पसरले. यासोबतच पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्याने जाणारे नागरिक चांगलेच त्रस्त झाले. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावणे पसंत केले.

  • पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात आज 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. तसेच हवामान विभागाने वातावरण ढगाळ राहणार असून दुपारून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजाला बगल देत निसर्गाने अनोखा चमत्कार केला. पावसाऐवजी हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.