Pimpri : बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना, अमित गोरखे यांनी मानले सरकारचे आभार

एमपीसी न्यूज – बार्टीच्या धर्तीवर (Pimpri) आता मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. या घोषणेचे स्वागत करत भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी सरकारचे आभार मानले.

याबाबत गोरखे म्हणाले की, मातंग समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना व्हावी, ही मागणी मागील बऱ्याच वर्षापासून मातंग समाज करत होता. आज ती मागणी शासनाने मान्य केली, असून येणाऱ्या काळामध्ये आर्टीची स्थापना करण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडत असताना घोषणा केली आहे.

PCMC : क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना राज्य सेवेत परत पाठवा; भाजप चिटणीसाची मागणी

ही घोषणा मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची ठरणारी आहे. मातंग समाजातील (Pimpri) विशेषतः शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते निश्चितपणे या घोषणेने सुखवणार असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.