PCMC : क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना राज्य सेवेत परत पाठवा; भाजप चिटणीसाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या (PCMC )क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आले आहे. त्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ करतात.

त्यांचा महापालिकेतील कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांना शासन सेवेत परत पाठविण्याची मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात (PCMC )म्हटले आहे की, सुचेता पानसरे या राज्य सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचा महापालिकेतील तीन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांना प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आले आहे.

 

Pimpri : शाळांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावणे अनिवार्य करा; रयतची मागणी

नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार दाखल केली तरीही कारवाई करण्यात येत नाही. निगडीतील  पीएमपीएमएल बस स्टॉपच्या लोखंडी शेड चोरी झाली. भक्ती-शक्ती उद्यान येथे हातगाडी धारक व टपरीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

https://www.youtube.com/watch?v=i-EMCHflbtI&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.