Pimpri News : महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 93 वी पुण्यतिथी साजरी

एमपीसी न्यूज  :  पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात रयतमाऊली  लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 93 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.(Pimpri News) या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मृणालिनी शेखर उपस्थित होत्या.

 

आपल्या मनोगतातून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील लक्ष्मीबाईंच्या योगदानाचे विविध पैलू उलगडून दाखविले. स्त्रियांच्या अश्रूंमध्ये फार मोठी ताकद असते, सीतेच्या अश्रूंमुळे रामायण घडले, द्रौपदीच्या अश्रूंमुळे महाभारत घडले आणि लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमुळे आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था म्हणून रयत शिक्षण संस्था नावारूपास आली असे  लक्ष्मीबाईंबद्द्दलचे गौरवोद्गार त्यांनी आपल्या भाषणाद्वारे काढले.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून रयतेच्या स्थापनेत कर्मवीर अण्णांना लक्ष्मीबाईंच्या कार्याचा कसा हातभार लागला याबद्दलचे (Pimpri News विवेचन विविध घटनांच्या आधारे दिले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो हे वाक्य कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मी वहिनींना तंतोतंत लागू होते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 

Pune News : पुण्यातील कात्रज मध्ये एका व्यावसायिकाची फसवणूक

 

सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रो.डॉ.भारती यादव यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. संग्राम गोसावी यांनी आभार मानले तर प्रा.डॉ. सोनाल बावकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रो.डॉ.माधव सरोदे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. शहाजी मोरे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. अनिकेत खत्री, कार्यालय अधीक्षक रत्नप्रभा नाईक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.