Pimpri Market : प्लास्टीक कारवाईवरुन ‘कॅम्पा’त व्यापारी-महापालिका अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ; तीन तास बाजारपेठ बंद

0एमपीसी न्यूज – प्लास्टीक  पिशव्यांच्या कारवाईवरुन पिंपरी कॅम्पातील (Pimpri Market) व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. महापालिका अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात, अधिकार्यांनी झटापटी केली. आमच्याच दुकानात घुसून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत अशी तीन तास बाजारपेठ बंद ठेवली. आयुक्तांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर व्यापाऱ्यांची चार वाजता दुकाने खुली झाली. 

प्लास्टिक वापरावर बंदी आहे. महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. आज (बुधवारी) सकाळी महापालिकेचे प्लास्टिक विरोधी पथक पिंपरी कॅम्पात धडकले. प्लास्टिक वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरु केली. पवन ड्रायफुड येथील कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. काही ठिकाणी पाच हजार तर काही ठिकाणी दोन हजार रुपयांच्या दंडात्मक पावत्या फाडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. आमच्याकडे प्लास्टिक नियमानुसार वापरण्यास परवानगी असलेल्या जाडीच्या बॅगा आहेत. असे असतानाही कारवाई कशी केली जाते? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला.

Pimpri News : डी वाय पाटील कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक, शैक्षणिक फसवणूक

त्यावर अधिकाऱ्यांनी 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी (Pimpri Market) असल्याचे सांगितले. त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी झटापटीचा केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांनी दुकानात येऊन प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करावी. त्याला आमची हरकत नाही. पण, एक दोन अधिकारी येण्याऐवजी 10 ते 15 जण थेट दुकानात घुसतात. अरेरावीने बोलतात. आम्ही का चोर आहोत का, प्लास्टिक सापडले तर कारवाई करावी. पण, अधिकाऱ्यांची दुकानात घुसण्याची, बोलण्याची पद्धत चुकीची आहे. शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते; असा आरोपही व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे कारवाईविरोधात सर्व व्यापारी एकत्र आले. तीन तास बाजारपेठ बंद केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेत बाजारपेठ सुरु केली.

Pimpri Market
आयुक्त राजेश पाटील यांनी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांनी व्यापाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी कॅम्पात पाठविले होते. घोडके म्हणाले, कि ”75 मायक्रॉनच्या बॅगा उपलब्ध होत नसल्याने दुसऱ्या बॅगा वापरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचे मत जाणून घेतले. निवेदन स्वीकारले. व्यापाऱ्यांच्या समस्या आयुक्तांपर्यंत पोहचविल्या जातील. प्लास्किटकचा वापर कमी करावा. कापडी पिशव्यांचे वापर करणे काळाची गरज आहे. प्लास्किट निर्मुलानाकरिता महापालिका प्रयत्न करत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे”.

व्यापाऱ्यांचे सवाल – Pimpri Market

  1. दुकानामध्ये 51 मायक्रॉनच्या पिशव्या वापरण्यास परवानगी असताना दंड कशासाठी?
  2. तपासणीचा अधिकार कोणाला, तपासणीसाठी अधिकारी सोडून सर्व कर्मचारी घुसतात, 10 ते 12 जण एकाचवेळी घुसून दहशत निर्माण करतात.
  3.  तपासणीनंतर पंचनामा न करता बळजबरीने दंडाची पावती फाडण्यासाठी दबाव
  4.  पैसै दिले नाही तर 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी
  5. तपासणी पथकासोबतच्या मार्शलची अरेरावीची भाषा, अंगावर धावून येणे
  6. प्लास्टिक उत्पादकांच्या दुकानांच्या तपासणीऐवजी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी
  7. अतिक्रमणावर कारवाई न करता व्यापाऱ्यांवर कारवाई
  8. आज कारवाईदरम्यान दुकान मालकाच्या मुलाला धक्काबुक्की
व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर पिंपरीचे पोलीस निरीक्षक, तसेच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील घटनास्थळी पाठवण्यात आली होती. आयुक्तांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्यात पोलीस बंदोबस्त कमी केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.