Pimpri: किल्ले लग्न समारंभासाठी देण्याच्या निर्णयाचा ‘मनसे’ने केला निषेध

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्नसमारंभासाठी दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्याना विकण्याचा सरकारच्या संतापजनक निर्णयाचा पिंपरी-चिंचवडचे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकारने निर्लज्जपणाचा कहर केल्याचा आरोपही चिखले यांनी केला आहे.

या निर्णयावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध सुरु झाला आहे.

याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, ”रक्ताचे पाणी करुन बनवलेली आणि कमावलेली महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अस्मितेचा मानबिंदू असलेले गड किल्ले आहेत. भाड्याच्या सरकारने निर्लज्जपणाचा कहर करत गडकिल्ले लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मनसेच्या वतीने जाहीर निषेध करतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.