Pimpri Molestation Case : विवाहित महिलेचा विनयभंग; पती आणि दिरास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पिंपरीमध्ये विवाहितेचा विनयभंग (Pimpri Molestation Case) करण्यात आला असून तिच्या पती व दिरास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हि घटना 26 जून रोजी घडली. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपुराज उर्फ जितू मोहोरा (अंदाजे वय 19 वर्षे, रा. पिंपरी) हा आरोपी आहे.

Bhosari : भोसरीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

26 जून रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळ राहणारा आरोपी मोहोर याने फिर्यादीच्या घरी येऊन “तू मला लई आवडते, तू माझ्याशी लग्न कर, तू नाही म्हणाली तर तुझ्या नवऱ्याला आणि दिराला त्यांच्या कामावरच खल्लास करून टाकीन. असे म्हणून फिर्यादीचा हात धरून मानस लज्जा होईल असे कृत्य केले. फिर्यादीच्या पती व दीराला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी (Pimpri Molestation Case) पोलिसांनी आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 452, 354(ड), 509, 506(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.