Pimpri: राष्ट्रवादीकडून भाजप खासदार पूनम महाजन यांचा निषेध

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत करणा-या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. भाजपा आणि आरएस्‌एस्‌ची संस्कृतीच मुळात ज्येष्ठांचा आणि महिलांचा अनादर करणारी आहे. हेच महाजन यांच्या बोलण्यातून सिद्ध झाल्याची टीका, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली.

  • पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पूनम महाजनचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा निषेधाच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, योगेश गवळी, ज्येष्ठ नगरसेविका उषा वाघेरे, संगिता ताम्हाणे, निकिता कदम, उषा काळे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, प्रवक्ते फजल शेख, महिला सरचिटणीस कविता खराटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, निलेश पांढारकर, कामगार नेते रोझारिवो डिसोजा, विनोद कांबळे, गंगा धेंडे, कुणाल थोपटे, प्रशांत कडलग, दिपक साकोरे, दत्तात्रय जगताप, अमित बच्छाव, महेश माने, बाळासाहेब पिल्लेवार, अलोक गायकवाड, हर्षवर्धन भोईर, राजाराम सावंत, गोरोबा गुजर, दिपाली देशमुख, प्रियांका सुतार, सचिन मोरे, अभिजीत आल्हाट, मंगेश बजबळकर, सचिन औटे, गोपीचंद जगताप, युनिस शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.