Pune : पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी वारजे आणि नवीन होळकर या सर्व जलकेंद्रवरील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी पुणे शहराचा 7 फेब्रुवारी 2019 गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच दुसर्‍या दिवशी अर्थात शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी आता जपून वापरावे लागेल. सध्या शहरात पाणीपुरवठा विभागाकडून दूरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनीहि पाणी बचत करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.