Pimpri News: महापालिकेतील 27 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खाबडे यांची सह शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी,  लेखाधिकारी प्रदीप बाराथे यांची उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदावर पदोन्नती देण्यात आली.

या अधिकाऱ्यांसह विद्युत, नगररचना, अग्निशमन विभागातील अशा 27 कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने बढती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी काढला आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिका पदोन्नती समितीची 30 मार्च रोजी  बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता वासुदेव अवसरे, दिलीपकुमार भोसले, सचिन नागरे यांना  उपअभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

नगर रचना विभागाचे उप अभियंता संदेश खडतरे यांची सहाय्यक संचालक नगररचना या पदावर, विद्युत विभागाचे बापूसाहेब रोकडे, जालिंदर काळभोर यांना कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

अग्निशामन विभागातील एकाच वेळी 18 फायरमन यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त पदावरील 18 फायरमन यांना लिडिंग फायरमन (प्रमुख अग्निशमन विमोचक) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

मात्र, या कर्मचाऱ्यांनी यांच्या जागी नवीन कर्मचारी नेमणूक होत नाही तोपर्यंत फायरमन आणि लिडिंग फायरमन या दोन्ही पदांचे कामकाज करणे बंधनकारक राहणार आहे. पदोन्नती झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद होणार असून त्यांच्या पदासाठी असलेली वेतन श्रेणी लागू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.