Pimpri News : महापालिका सहाय्यक आयुक्तपदी रविकिरण घोडके, प्रशासन अधिकारीपदी शीतल वाकडे यांची नियुक्ती  

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या सेवेतील गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली. तर, मुख्याधिकारी ‘ब’ संवर्गातील शीतल वाकडे यांची पिंपरी महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागात गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावर रविकिरण घोडके कार्यरत होते. त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. त्यांना महापालिकेत रुजू होण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागातून कार्यमुक्त करण्यात आले.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घोडके यांना महापालिकेत रुजू करुन घेतले आहे. सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची बदली झाल्याने एक पद रिक्त होते. त्याजागी घोडके यांची नियुक्ती झाली आहे.

तर, मुख्याधिकारी ‘ब’ संवर्गातील चंद्रपूर महापालिकेतील सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे यांची पिंपरी महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांनाही रुजू करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.