Pimpri News: भाजप भ्रष्टाचारात बरबटलेला पक्ष; पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर काँग्रेसची स्वबळावर सत्ता येणार – नाना पटोले

एमपीसी न्यूज – भाजप भ्रष्टाचारी पक्ष असून भ्रष्टाचारामध्ये लगबग झाला आहे. भाजपने खोटं बोलून देशातील सत्ता आणली. आज आज देश विकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेतील भाजपचे स्थानिक लोक जे काय करतात ते काही नवीन करत नाहीत. त्यांचे जे दिल्लीत आका बसले आहेत. तेही तेच काम करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी केला. पुणे आणि  पिंपरी-चिंचवड  या दोन्ही शहरांमध्ये काँग्रेस पक्षाचे मूळ आहे. दोन्ही महापालिकेत काँग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी आज पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी रॅली काढली. पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले,
भाजप काय आहे, त्यांची  मानसिकता काय आहे.  हे आता लोकांना समजायला लागला आहे. भ्रष्टाचाराच्या दलदलीत  बरबटलेल्या भाजपबद्दल किती बोलावे हे कमी आहे. आज वसंत पंचमीचा दिवस आहे. वसंतपंचमीची सुरुवात नवीन पालवीने होते. काँग्रेसमध्ये सज्जन व्यक्ती, डॉक्टर असे विद्वान लोक येत आहेत. याचाच अर्थ शहरात काँग्रेसला नवीन पालवी येत आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांचे पिंपरी-चिंचवड शहराबाबतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील लोक काँग्रेसला साथ देतील.

काँग्रेस पक्षाच्या विचाराचे लोक पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात आहेत. त्याच्यामुळे कोणी एकला चलो म्हटलं असेल तर त्यांना लखलाभ असो, पण, काँग्रेस पक्षाचे मूळ या दोन्ही शहरांमध्ये आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर पुणे आणि  पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेवर येणार आहे. या शहरामध्ये दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती.  जनतेचा आशीर्वाद ज्याच्या बाजूने मिळतो तो मोठा होतो आणि आम्हाला विश्वास आहे. पिंपरी-चिंचवड शहराला चांगले करण्यासाठी शहरातील जनता काँग्रेसलाच आशीर्वाद देणार आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेची साथ मिळेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी रावेत ते दापोडी अशी भव्य परिवर्तन दुचाकी रॅली काढली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, विश्वास गजरमल, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले तसेच अशोक मोरे, विश्वनाथ जगताप, दिनकर भालेकर, माऊली मलशेट्टी, किरण नढे, संजिव झोपे, शाकीब खान, डॉ. वसिम इनामदार, कौस्तुब नवले, निखिल भोईर, झेवियर ॲन्थोनी, ॲड. उमेश खंदारे, हिरा जाधव, आबा खराडे, प्रा. किरण खाजेकर, इस्माइल संगम, तारीक अख्तर, स्वाती शिंदे, रोहित भाट, सौरभ शिंदे, रोहित तिकोणे, विजय ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, स्वप्निल बनसोडे, रवि नांगरे, अशोक धोत्रे, मधुकर पाटील, बाळासाहेब पवार, रमेश हरिभक्त, विजय चौगुले आदी उपस्थित होतेकिवळे – मामुर्डी – रावेत – वाल्हेकर वाडी – चापेकर चौक – चिंचवड स्टेशन – मोरवाडी चौक – अजमेरा कॉलनी – नेहरुनगर – संत तुकाराम नगर – वल्लभनगर – नाशिक फाटा – कासारवाडी – फुगेवाडी – दापोडी रॅलीच्या या मार्गावर ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. अजमेरा कॉलनी येथे बीएसपीचे शहराध्यक्ष सुरेश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रिती गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, चिंचवड गावातील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांना सर्व उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.