Chikhali News: ‘एमएनजीएल’च्या पाइप लाईनमुळे जाधववाडीतील कोलोसस ग्रीन सिटीतील रहिवाशी त्रस्त  

एमपीसी न्यूज – महानगर नॅचरल गॅस कंपनी’ला (एमएनजीएल) पाइप लाइनच्या खोदाइमुळे चिखली जाधववाडी येथील कोलोसस ग्रीन सिटी फेज 1 मधील रहिवाशी त्रस्त आहेत. खोदाई दरम्यान अनेक चुका झाल्या असून सोसायटीची वीजेची मेन लाईन आणि  पाण्याची पाइप लाइन डिस्टर्ब होते आहे.  यासाठी रस्ता बदला असे सुचवण्यात आले. परंतु ते 3 महिने झाले जुमानले जात नसल्याचा आरोप गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यकारी समितीने केला आहे.

याबाबत गृहनिर्माण सोसायटीच्या समितीने पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, एमएनजीएल पाइप लाइनच्या खोदाइत नियोजनचा अभाव आहे. जेसीबी कॉस्ट कमी करावयाच्या प्रयत्नात एका दिवसात जवळपास 100 पार्किंग समोरील बाजूस खोदाई एकाचवेळी केली. खड्डे खोदत असताना पर्यायी रस्त्यासाठी मार्गदर्शन फलक लावणे गरजेचे असताना लावले नव्हते. राडारोड उचलताना रस्त्यास जागा दिली जाईल. याची काळजी घेतली नव्हती. गेट जवळ आणि डी विंग नंतर केलेलं कट मार्किंग अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आमचे मेन लाईट ची लाईन आणि मेन पाइप लाइन डिस्टर्ब होते आहे. यासाठी रस्ता बदला असे सुचवण्यात आले. परंतु ते 3 महिने झाले सोसायटीला जुमानत नाहीत.

तसेच काम करताना कामाची सर्व माहिती लिखित स्वरूपात जमा करणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता एकदा मॅपवर स्वाक्षरी  करून घेऊन गेले. मॅप अपडेट  करण्याचे काम केले नाही. कामा संबंधित नकाशे हे पूर्ण असावेत व त्यावर खोदाई होणार असेल तर त्याची ले – आऊट निशच्चीत करण्यात यावी अशी अपेक्षा असताना सविस्तर माहिती दिली गेली नाही.  काम हे सर्व मार्गाने अडचण निर्माण होईल असे  आहे. काम करताना रहिवासी भागात काम करत आहेत. याची जाणीव ठेऊन पर्यायी व्यवस्था करूनच काम करण्यात आले पाहिजे याची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. दरम्यान, याबाबत  एमएनजीएलच्या अधिका-यांची बाजू मिळताच ती बातमीत अपलोड केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.