Pimpri News: सप्टेंबरमध्ये कोरोनाची रुग्णवाढ कमी होईल, आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला अंदाज

Pimpri News: Corona outbreak to slow in September says Commissioner Shravan Hardikar मागील काही दिवसांपासून दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सप्टेंबरमध्ये ‘प्लॅटवू’ म्हणजेच रुग्णसंख्या स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रुग्णवाढ कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. आयुक्तांच्या अंदाजमुळे शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात होती. पण, 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून बाहेर काढले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. जुन, जुलैमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. ऑगस्टच्या पंधरवाड्यात रुग्णवाढीचा आलेख उंचावताच राहिला आहे.

ऑगस्टअखेर रुग्णसंख्या 55 ते 60 हजार होईल असा प्रशासनाचा कयास आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त केली जात होती. रुग्णवाढीचा आलेख कधी कमी होईल असा प्रश्न शहरवासीयांना पडला होता. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा आलेख कमी होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, सप्टेंबरपर्यंत ‘प्लॅटवू’ म्हणजेच रुग्णवाढ स्थिर होईल असा अंदाज आहे. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. दररोजचा आकडा सातशे ते आठशेच्या आसपास राहिल. पण, स्थिर होईल. मोठ्या संख्येने रुग्ण वाढणार नाहीत असा अंदाज आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्यास एक जम्बो रुग्णालय सुरु ठेवता येईल. त्यानंतर वायसीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी सुरु करता येईल. कोविड व्यतिरिक्त दुसरे आजार असलेल्या रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार करता येतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.