23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Pimpri News : शहरात बुधवारी 16 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग दुसऱ्यादिवशी ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (बुधवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणारPimpri 

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या आणि कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

 45 वर्षापुढील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!

प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना येथे कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.  कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या आणि किऑस्क प्रणालीद्वारे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.  ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

spot_img
Latest news
Related news