Pimpri News : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात युवा सेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या माध्यमातून पेट्रोल ,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेने महागाईविरोधात आंदोलन केले.  हातगाडीवर मोटर बाईक ठेवून त्याला हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात  प्रतिकात्मक  अंतयात्रा काढण्यात आली. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात  युवा सेनेचे शहर अधिकारी   विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) झालेल्या आंदोलनात शहर समन्वयक रुपेश कदम ,शहर चिटणीस अभिजीत गोफण, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके, युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, पंकज दीक्षित, अक्षय परदेशी, मंदार यळवंडे, करण वाल्हेकर, रोहन शेटे, वतन वाल्हेकर, दिनेश चव्हाण, रवि नगरकर,  केदार चासकर, निखिल येवले, राहुल पालांडे, आशिष बाबर,प्रमोद चव्हाण , सागर शिंदे,शरद जाधव आदी सहभागी झाले होते.

कोरोना महामारीमुळे नागरिक आर्थिक संकटात आहे. या संकट काळात केंद्र सरकारकडून दररोज पेट्रोलच्या भाव वाढविले जात आहेत. पेट्रोल 107 रुपये लिटर झाले आहे. डिझेलचेही भाव वाढतच आहेत. घरगुती गॅसच्या किमतीतही  भरमसाठ वाढ केली आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत नाही. ही दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी  विश्वजीत बारणे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.