Pimpri: शहरातील 54 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; भोसरी, वडमुखवाडीतील काही परिसर सील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 54 कोरोना संशयितांचे रिपोर्ट आज (मंगळवारी) सायंकाळी निगेटीव्ह आले आहेत. तर, सकाळी शहरातील आणि शहराबाहेरील अशा 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. आज दिवसभरात शहरातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे रिपोर्ट एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सायंकाळी आले. त्यामध्ये 54 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. तर, आज आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

आज सकाळी आनंदनगर, भोसरी, रुपीनगरमधील सात जणांचे, तर पुणे आंबेगाव येथील तीन अशा दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले  होते. तर, दुपारी महापालिका हद्दीबाहेरील 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.  असे  दिवसभरात एकूण  19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिका रुग्णालयात 84 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील 233 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर, शहरातील सहा आणि पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात आठ अशा 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील 11 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहराबाहेरील  22 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 101

# पॉझिटीव्ह रुग्ण – 19

#निगेटीव्ह रुग्ण – 54

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 118

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 209

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 54

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 233

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 84

# शहरातील कोरोना बाधित 11 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  14

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 132

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 33652

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 102902

भोसरी, वडमुखवाडीमधील ‘हा’ परिसर सील !

भोसरी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे क्षितीज डेस्टिनेशन, भोसरी (भारत पेट्रोलिएम पंप-ग्लोबल स्कूल- दुर्वांकुर लॉन्स मागील बाजू-बनाचा ओढा- सिमेंट ग्राऊंड-महालक्ष्मी जनरल स्टोअर-ए 1 चायनिज सेंटर), अलंकापुरम रोड, वडमुखवाडी (श्री समर्थ गॅरेज- शिवराज ग्रीन टेक-अलंकापुरम रोड-नील मोटर्स) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.