Pune : कोरोनामुळे आज आणखी 8 जणांचा मृत्यू ; एकूण बळी 207

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच असून आज (मंगळवारी) आणखी 149 रूग्ण नव्याने आढळले आहेत. तर, 8 जणांचा मृत्यू झाला. 110 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत या रोगामुळे 207 जणांचा बळी गेला आहे.

शहरात एकूण 156 कोरोनाबाधित रुग्ण गंभीर असून, 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे आता एकूण 3 हजार 747 रुग्ण झाले आहेत. आज 4 महिला आणि 4 पुरुषांचा या रोगामुळे मृत्यू झाला.

पुणे जिल्हयातील 4 हजार 280 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 165 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 157 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाने पुण्यात हाहाकार माजविला असून रोज 1500 ते 1600 कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी रुग्ण वाढणार असल्याने 3 हजार बेड वाढविण्यात येणार आहेत. बालेवाडीत 500 बेडस तयार ठेवण्यात आले आहेत. शहरातील मृतांचा आकडा आता 200च्या वर गेला आहे.

येरवड्यातील 64 आणि 65 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात, 50 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 79 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 67 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 70 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 72 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 50 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्तही इतर आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.