Pimpri: आनंदनगर, वाकड, रहाटणी, चिखली, रावेतमधील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

कोरोना बाधितांचा आकडा पोहचला 240 वर; 138 जण कोरोनामुक्त,  आजपर्यंत 15 जणांचा  मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली आणि रावेत येथील सात जणांचे रिपोर्ट  आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय बोपोडी आणि साता-यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे दिवसभरात नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 240 वर पोहचला  असून 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आजपर्यंत कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे दुपारी रिपोर्ट आले आहेत.

त्यामध्ये चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली आणि रावेत येथील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 11, 17, 19, 30, 37 वर्षीय पुरुष आणि 25, 27 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय बोपोडी आणि साताऱ्यातील रहिवासी पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 31, 36 वर्षीय दोन पुरुषांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

तर, तळवडे, मोशी, जुनी सांगवी, खराळवाडी, ताडीवाला रोड येथील सात जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका रुग्णालयात 97 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील 240 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरातील सहा आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या नऊ अशा 15 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, शहरातील 12 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.