Pimpri: ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरुवात; एनजीओ, गृहनिर्माण संस्थांना सहभागी सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. या अभियानात नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे. तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे. त्या अनुषंगाने पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामधील नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांनी स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत पिंपरी-चिंचवड स्वच्छ थॉन 2020 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक बंदी मोहिम, पाण्याचा पुर्नवापर इत्यादी स्वच्छता विषयक बाबींबाबत करण्यात येत असलेल्या उपक्रमांची तपशिलवार माहिती महापालिकेच्या [email protected] या ईमेल आयडीवर 15 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यात यावीत. यामध्ये शहरातील जास्तीत-जास्त नागरीक / संस्था यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1