Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी चार मोटारसायकल पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत निगडी, चाकण, तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख एक हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत.

चंद्रकला कालिदास कुंभार (वय 57, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकला यांनी आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर त्यांची 22 हजार रुपये किंमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 / सी व्ही 2290) पार्क केलेली चोरटयांनी पळवली.

मल्लिकार्जुन भीमाशंकर मठपती (वय 23, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन यांनी त्यांची दुचाकी (एम एच 14 / जे जे 7173) कडाचीवाडी येथील गणपती मंदिरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने 35 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना 27 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

कुणाल सूर्यकांत मंडलिक (वय 19, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. कुणाल यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 11 / सी के 5550) घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

धीरज राजू सोनके (वय 19, रा. सिद्धिविनायक नगरी रोड, निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज यांनी त्यांची चार रहजार रुपये किमतीची दुचाकी घराच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. चोरट्याने पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.