Pimpri : जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठमध्ये त्रिदिवसीय किर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज – जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेज संतपीठ (Pimpri) येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त त्रिदिवसीय महिला किर्तन महोत्सवाचे 2 ते 4 जानेवारी या कालावधीत पार पडले.

इ.स. 12 व्या शतकापासून वारकरी सांप्रदायाने संत साहित्याच्या आणि संत परंपरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात व भारताबाहेर समाजप्रबोधनाचे कार्य केले. याच विचारांनी सामाजिक जडणघडणीत संतानी मोलाची भूमिका बजावली. मागील वर्षी सुरु झालेला हा किर्तन महोत्सव यंदा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त संतपीठ संचालक मा. ह.भ.प अभयजी टिळक, ह.भ.प.राजू महाराज ढोरे, संचलिका डॉ. स्वाती मुळे, ह.भ.प रोहिदास महाराज मोरे अध्यक्ष टाळगाव प्रासादिक दिंडी, चिंतन समिती सदस्य, सांस्कृतीक समिती सदस्य, अभ्यासक समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यवेक्षक लक्ष्मण मोहरे, साहेबराव सुपे आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि वाद्यपुजन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

दररोज 3 ते 4 हरिपाठ सेवा घेऊन किर्तन सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी ह.भ.प. तेजस्विनीताई कुलकर्णी यांनी आपल्या नारदीय किर्तनात ll आपुलिया हिता जो असे जागता l धन्य माता पिता तयाचीया l कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक l तयाचाहरीख वाटे देवा ll या तुकाराम महाराजाच्या अभंगांवर निरूपण करताना स्त्रियांचे समाजातील महत्त्व आणि स्थान सांगीतले.

दुसऱ्या दिवशी ह.भ.प गौरीताई सांगळे यांनी llमाझ्या मना लागो चाळाl पहावया विठ्ठल डोळाl आणिक नाही चाड l न लगे संसार हा गोड ll या तुकाराम महाराजाच्या अभंगांवर निरूपण करताना भगवान पांडुरंग परमात्माच्या नामस्मरणाचे वेड कसे लागते हे तुकाराम महाराजांचे (Pimpri) उदाहरण देऊन सांगीतले.

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपची बैठक

भक्त व भक्ती यांचे यथार्थ वर्णन केले. तिसऱ्या दिवशी गायत्रीताई थोरबोले यांनी ll हेची दान देगा देवा l तुझा विसर न व्हावा l गुण गाईन आवडी l हेचि माझी सर्व जोडी ll या तुकाराम महाराजाच्या अभंगांवर निरूपण करताना संतांचे विचार, भक्तीचे माहात्म्य आणि परमेश्वराची उपासना कशी करावी हे संत कबिरांचे दोहे आणि संत मिराबाईंचे भक्तीचे दाखले देऊन सांगीतले.

किर्तन महोत्सवासाठी गायनाची साथ ह.भ.प. राजू महाराज ढोरे, विलास महाराज कोकाटे, तबला वादक विवेक भालेराव, पखवाज वादक महेश शेळके व अविनाश भोगिल, हार्मोनियम वादक नेहा नाफडे, चंद्रकांत पुरीगोसावी, ह.भ.प शेलार महाराज आदिंनी साथ दिली.

आळंदी देवस्थान विश्वस्त मा. ह.भ.प भावार्थजी देखणे यांच्या अनमोल मार्गदर्शनाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुक्त शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक आदिंच्या माध्यमातून करण्यात आले.

जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.