Wakad : वाहन विक्रीतून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 8 लाख 25 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वाहन विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवून (Wakad) देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 या कालावधीत जीएस रॉयल मोटर्स वाकड येथे घडली.

प्रदीप दगडू चाळक (वय 47, रा. चाळकवाडी, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल कुमार दिलीप जैन (रा. पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपची बैठक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, आरोपीने फिर्यादी यांना वाहने विक्रीतून जास्तीत जास्त नफा (Wakad) मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून त्याने फिर्यादी कडून सुरुवातीला 75 हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून साडेसात लाख रुपये किमतीचे बोलेरो हे वाहन घेतले. ते विकून देतो असे आमिष दाखवून आरोपीने बोलेरो गाडी स्वतःच्या ताब्यात घेऊन परस्पर विकली. त्याचे पैसे फिर्यादीस न देता आरोपीने फिर्यादी यांची एकूण आठ लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.