Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपची बैठक

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख 70 नेत्यांची बैठक येत्या रविवारी (दि. 7) पुण्यात होत आहे. यामध्ये भाजपकडून लढविल्या जाणाऱ्या संभाव्य 23 ते 25 जागांवर मंथन होणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीत पुणे लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी भाजपकडून 23 ते 25 जागा लढविल्या जाण्याची शक्यता आहे.

Pune : कात्रज दूध डेअरीला जागा देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध- अरविंद शिंदे

त्यात पश्चिम महाराष्ट्रातील किमान सात जागांचा समावेश आहे. आगामी पुणे लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार असेल, याची चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार सांजयनाना काकडे, आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.