Pimpri : पुन्हा रंगमंचावर उभा राहण्यासाठी डॉ. शैलेश देशपांडे यांची उपचारपद्धतीच कारणीभूत -शरद पोंक्षे

डॉ. शैलेश देशपांडे यांचे 'सर्च क्लिनिक' सोमवारपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत नव्या रूपात दाखल

एमपीसी न्यूज – दुर्धर आजाराला टाळून पुन्हा नाटकाच्या मंचावर उभं राहण्याचे मानसिक आणि शारीरिक बळ होमिओपॅथी तज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांच्या उपचारपद्धतीमुळे मिळाले आहे. डॉ. देशपांडे यांनी ‘तुम्ही नाटकाची जबाबदारी घ्या, मी तुमची जबाबदारी घेतो’ असा विश्वास दिला आणि मी नाटक करण्यासाठी तयार झालो. पुन्हा नाटकाच्या रंगमंचावर उभा राहण्यासाठी डॉ. देशपांडे यांची होमिओपॅथी उपचार पद्धतीच कारणीभूत ठरली, असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

नामवंत होमिओपॅथी तज्ञ व कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांचे ‘सर्च क्लिनिक’ पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत पुन्हा नव्या रूपात दाखल झाले आहे. क्लिनिकच्या उदघाटन प्रसंगी पोंक्षे बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शरद पोंक्षे, शिवराज गोर्ले यांच्या हस्ते नव्या रूपातील सर्च क्लिनिकचे उदघाटन झाले.

यावेळी डॉ. रजनी इंदुलकर, मनोहर पारळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्या वंदना गुप्ते या काही कारणास्तव कार्यक्रमासाठी येऊ शकल्या नाहीत. त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. सोमवार (दि. 17 फेब्रुवारी) पासून सर्च क्लिनिक रुग्णांच्या सेवेत सादर होत आहे.

शरद पोंक्षे म्हणाले, “मागील वर्षी मला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर अनेक उपचार झाले. शरीर आणि मन दोन्ही थकू लागले होते. त्यावेळी पुण्यातील एका मित्राने डॉ. शैलश देशपांडे यांचे नाव सुचवले आणि मी पुण्यात डॉ. शैलेश देशपांडे यांच्या सर्च क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल झालो. पहिल्या भेटीतच ‘बरं वाटणं आणि बरं होणं’ यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन इतर उपचार पद्धतीच्या कोणत्याही गोळ्या-औषधं न घेण्याचे निक्षून सांगितले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व बाबी मी पाळल्या आणि आज तंदुरुस्तपणे उभा आहे.”

डॉ. देशपांडे यांनी इतर उपचार पद्धतीची कोणतीही औषधे घेण्यास मज्जाव केल्याने उपचाराचे सर्व दरवाजे बंद झाले होते. दरम्यान, नवीन नाटकाची सुरुवात करायची होती. त्यापूर्वी डॉ. देशपांडे यांना नाटक सुरु करण्याबाबत विचारले असता ‘तुम्ही नाटकाची जबाबदारी घ्या, मी तुमची जबाबदारी घेतो’ असे डॉक्टरांनी सांगितले आणि मी निश्चिन्त झालो. काही दिवसातच मी पूर्ववत होऊन नाटकाच्या प्रयोगासाठी उभा राहू शकलो, असेही पोंक्षे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जाण्याची गरज नसून त्यांना आपल्या शहरात उपचार घेता येणार आहेत. दुर्धर आजारांवर संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करणारे सर्च क्लीनिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. सोसायटी फॉर एन्हान्समेंट अँड रिसर्च इन क्लासिकल होमिओपॅथी (SEARCH) या होमिओपॅथी मधील शास्त्रीय संशोधनाला वाहिलेल्या सर्च संस्थेची स्थापना डॉ. शैलेश देशपांडे यांनी 30 वर्षांपूर्वी केली. संशोधनावर आधारित रुग्णांवर उपचार करणा-या सर्च क्लिनिकची सुरुवात 1990 साली पिंपरीमधूनच झाली. दरम्यान, सर्च क्लिनिकने विस्तार करत पुण्यात देखील बालगंधर्व रंगमंदिरासमोर दुसरी शाखा सुरु केली. मागील 30 वर्षात 25 हजार पेक्षा अधिक रुग्णांवर शास्त्रीय पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. सर्च क्लिनिकने काढलेले निष्कर्ष रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जातात.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉ. शैलेश देशपांडे यांनी मधल्या काही काळात पुण्यातील सर्च क्लिनिकचे स्थलांतर संचेती हॉस्पिटलजवळ असलेल्या अद्ययावत व प्रशस्त वास्तूमध्ये केले. पुण्यातील वाढत्या व्यापामुळे सर्चचे पिंपरी येथील पहिल्या मूळ शाखेकडे लक्ष कमी झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांना उपचारासाठी पुण्यात यावे लागत होते. रुग्णांची ही हेळसांड कमी करण्यासाठी सर्चने पुन्हा आपल्या पिंपरी येथील मूळ शाखेला पुनर्जीवित करून नवीन रूपात रुग्णांच्या सेवेत आणण्याचा निर्धार केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, नितीश भारद्वाज, शरद पोंक्षे, वंदना गुप्ते, कीर्ती शिलेदार अशा अनेक दिग्गजांनी सर्चच्या उपचारांवर प्रशंसेची मोहोर उमटवली आहे.

डॉ. शैलेश देशपांडे व सर्चच्या कार्याची तसेच होमिओपॅथी या शास्त्राच्या विलक्षण परिणामकारकतेची ग्वाही देणारे ‘होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते’ हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. शिवराज गोर्ले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. चार वर्षात पुस्तकाच्या चार आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. कर्करोग, बालरोग, स्त्रीरोग, वंध्यत्व, मतीमंदत्व, मणके व सांध्याचे विकार आणि इतर क्षेत्रांमध्ये सर्चने केलेल्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. कॅन्सर संदर्भातील संशोधन व उपचारांवर आधारित सर्चने केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरलेले आहे. या जीवघेण्या रोगाने ग्रस्त असलेले हजारो रुग्ण सर्चच्या उपचारानंतर आनंदी जीवन जगत आहेत.

डॉ. शैलेश देशपांडे म्हणाले, ”माझ्या संशोधन कार्याची सुरुवात पिंपरी मधून झाली. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांनी माझ्यावर आणि होमिओपॅथीच्या उपचारांवर विश्वास दाखवला. त्यामुळेच सर्चचे कार्य विस्तारले आहे. या सर्व रुग्णांप्रती मी कृतज्ञ आहे. पिंपरी-चिंचवड मधील रुग्णांची उपचारासाठी पुण्याला येण्याची दगदग कमी करण्यासाठी पिंपरी येथे पुन्हा नव्या रूपात सर्च क्लिनिक सुरु होत आहे. 17 फेब्रुवारी पासून सर्च क्लिनिक रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे.”

डॉ. शैलेश देशपांडे पिंपरी येथील सर्च क्लिनिकमध्ये दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी साडेतीन ते साडेआठ या वेळेत असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.