Dehugaon News : तुकाराम बीज निमित्त पीएमपीएमएलकडून ज्यादा बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज – तुकाराम बीज निमित्त पीएमपीएमएल कडून सात मार्गांवरून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 20) तुकाराम बीज असल्यामुळे शनिवार (दि. 19) ते सोमवार (दि. 21) या कालावधीत या ज्यादा बसेस धावणार आहेत.

स्वारगेट ते देहूगाव, मनपा भवन ते देहूगाव, मनपा भवन ते आळंदी, देहूगाव ते आळंदी, स्वारगेट ते आळंदी, पुणे स्टेशन ते देहूगाव, निगडी ते देहूगाव या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

तुकाराम बीज निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात. तुकाराम बीज निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि उपनगरातून देहूगाव येथे जाणा-या भाविकांसाठी व प्रवाशांसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पीएमपीएमएल कडून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यादा बसेस देखील नेहमीच्या तिकीट दरात धावतील.

देहूगाव येथील परंडवाल चौक दर्ग्याजवळ कुणाल बिरदवडे यांच्या मोकळ्या जागेत पीएमपीएमएलचे तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे. इथून ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. देहूगाव येथून आळंदीला जाण्यासाठी देहूगाव-आळंदी रस्त्यावर विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळील मोकळ्या जागेतून ज्यादा बसेस सोडण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.