Maval News : नवलाख उंब्रेच्या सरपंचपदी सविता बधाले; तब्बल 32 वर्षांनंतर बधलवाडीला मान

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता रामनाथ बधाले पाच मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सविता बधाले विजयी झाल्या. सविता बधाले यांना नऊ तर त्यांच्या विरोधक आशा पंडित यांना चार मते मिळाली.

रिक्त झालेल्या जागेवर अध्यासी अधिकारी बाळासाहेब दरवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी आशा पंडित जाधव व सविता रामनाथ बधाले यांचे दोन अर्ज आल्याने गुप्तपद्धतीने मतदान झाले. त्यामध्ये आशा जाधव यांना 4 मते मिळाली तर सविता बधाले यांना 9 मते मिळाली. एकूण 13 सदस्यांमध्ये ही निवडणूक प्रकिया पार पडली.

नवलाख उंब्रे ग्रुप ग्रामपंचायत तेथील एमआयडीसी परिसरात येत असल्याने या ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे, त्यामुळेच या निवडणुकीला भाजपने शेवटपर्यंत चुरशीची बनवली, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच सरशी झाली.

सविता बधाले यांना 09 मते पडल्याने सरपंच म्हणून आध्यासी अधिकारी दरवडे यांनी सविता बधाले यांच्या नावाची घोषणा केली. सदर निवडणूक प्रक्रियेत ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर यांनी निवडणूक सभेचे इतिवृत्त लिहून सहकार्य केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच सविता बधाले यांचा सत्कार करण्यात आला.

तब्बल 32 वर्षांनंतर बधलवाडीला मान मिळाला असून याआधी प्रभाकर बधाले हे सरपंच झाले होते. तर बधलवाडीतील महिलेला प्रथमच सरपंचपद मिळाले आहे. विस्तार अधिकारी बाळासाहेब दरवडे, तलाठी सायरा मलबारी, ग्रामसेवक प्रमिला घोडेकर यांच्या उपस्थितीत निवडणुक झाली.

यावेळी आशा पंडित जाधव, सविता रामनाथ बधाले, चैताली पांडुरंग कोयते, राहुल भगवान शेटे, पंडित सुभाष दहातोंडे, सुनील मनोहर खंडागळे, मयूर भिवाजी नरवडे,अलका बाळू बधाले, सुवर्णा माणिक जाधव, उषा संभाजी दरेकर, वर्षाराणी गोरख काळोखे, सुवर्णा संग्राम कदम, विजया आप्पा शेटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.