Pune News : लतादीदी हा अंत नाही तर नव्या ‘लता पर्वाची’ सुरूवात – पं. हृदयनाथ मंगेशकर

एमपीसी न्यूज – वडील गेले तेव्हा मला कळतही नव्हेत, मृत्यू म्हणजे काय? ते गेले तेव्हा कोणत्या वर्तमानपत्रात, रेडीओ किंवा टीव्हीला बातमी आली नाही. पण जेव्हा दिदी गेली तेव्हा ४० देशांनी त्यांचे झेंडे उतरविले होते. संपूर्ण संगीतविश्व दु:खात बुडाले होते. बाबांचे हे पांग तिला फेडायचे होते. लतादीदी गेली नाही. हे पर्व संपले नाही, हा युगांत नाही तर नव्या ‘लता पर्वाची’ सुरूवात आहे, अशा भावना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.

पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्या वतीने पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी संवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, वीणा देव, राधा मंगेशकर, भारती मंगेशकर, पंडित उस्मान खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार, अभय सरपोतदार, समन्यवक अजित कुमठेकर यांनी केले.

यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून औक्षण करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. पूना गेस्ट हाऊस आणि पुण्यातील लता दीदींबरोबरच्या बालपणीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘जीवलगा कधी रे येशील तू’ या गीताच्या आठवणी उलगडल्या.

प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं ‘स्वर्ग सुख’! पिंपरी-फुगेवाडी मेट्रो प्रवास.. Day 2 | Ground Report व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, आई गेली तेव्हा एकदा वाटले आपण अनाथ झालो. तेव्हा दीदी मागे येऊन उभी राहिली आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाली तू तर गोट्या झाला आणि हसली. तेव्हा वाटले दीदी आपल्याबरोबर असताना आपण अनाथ होऊ शकत नाही. पण जेव्हा दीदी गेली तेव्हा माझ्या आत्मविश्वाला तडा गेला. आज मी अनाथ झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

किशोर सरपोतदार म्हणाले, देवाला भेटायला लोक मंदिरात जातात आणि त्याचे दर्शन घेतात. परंतु आज स्वतः देव दर्शन देण्यासाठी भक्तांना भेटायला आले आहेत. पं. हृदयनाथ मंगेशकर हे आमच्यासाठी संगीतातील देव आहेत आणि पुणेकर हे त्यांचे भक्त आहेत, असे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

‘मानसी चा चित्रकार तो’ हा सांगितीक कार्यक्रम देखील यावेळी सादर झाला. यामध्ये पुण्यातील मनीषा निश्चल, डॉ.अनघा राजवाडे, वैजू चांडवले, गौरी पुंडलिक, मयुरा काळे, माधुरी कासट, प्रांजली मानकेश्वर, राही शेंडगे, संजय मरळ, राजेश्वरी पवार, डॉ. अनघा मारावार, पल्लवी आनिखिंडी, रेवती सुपेकर, दीपिका पाटे, पूर्णीमा अदवंत, योगिता बडवे यांसह विविध कलाकार सहभागी झाले होते.

दरम्यान, पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद, त्यांची भेट आणि त्यांच्या सहवासात सांगितीक मेजवानी अनुभविण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळाली. प्राजक्ता मांडके – परहर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

एमपीसी न्यूज पॉ़डकास्ट… पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.