Pimpri : महापालिकेतर्फे तंबाखू नियंत्रणाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा रुग्णालय पुणे यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली. प्रबोधनात्मक पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कलाछंद संस्था, पुणे यांच्या वतीने पथनाट्य सादर केले. 

पिंपरी संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल शेजारी ही जनजागृती करण्यात आली. तंबाखू, गुटका, सिगारेट आदींचे दुष्परिणाम व होणारे नुकसान, आजारपण, याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

हा जागतिक तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, तंबाखू नियंत्रण समितीचे डॉ. राहुल मणियार, दिलीप करंजखेले, पर्यवेक्षक अन्न , पीसीएमसी, रवींद्र नागवेकर, बाळासाहेब मालुसकर, अनिता वाघचौरे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.