Pune : कंपनीच्या प्लांटमध्ये पार्क असलेल्या गाड्यांच्या अवघ्या एक तासात 16 बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या प्लांटमध्ये पार्क असलेल्या गाड्यांच्या (Pune) 16 बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही चोरी मंगळवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान वडमुखवाडी येथील इंगवले पाटील कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्लांटवर घडली आहे.

याप्रकरणी सागर ननासाहेब जंजिरे (वय 29 रा.चिखली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : वडिलांनी मुलीवर कुऱ्हाडीने वार करून केले गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगवले पाटील कंस्ट्रक्शन कंपनी या नावाने आर.एम.सी. प्लांट व डांबर प्लांटच्या पार्किंगमध्ये 25 (Pune) गाड्या पार्क होत्या. यातील 8 गाड्यांच्या 88 हजारच्या 16 बॅटरी चोरांनी चोरून नेल्या आहेत. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.