Pune News : रिक्षा संपामुळे पीएमपीएमएलची चांदी एका दिवसात कमावले तब्बल दोन कोटी

एमपीसी न्यूज एकाचा तोटा तो दुसऱ्याचा फायदा असतो असे म्हणतात कारण रिक्षा चालकांनी केलेला संप हा पीएमपीएमएल प्रशासनाच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे.(Pune News) या संपामुळे पीएमपीएमएलने सोमवारी (दि.28) यादिवशी तिकीट विक्री व पास विक्रीतून सुमारे 2 कोटी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. जो दैनंदिन उत्पन्नातील उच्चांक मानला जात आहे.

वेळेत रिक्षा न मिळाल्यामुळे सोमवारी सोमवारी  15 लाख 47 हजार प्रवाशांनी  पीएमपीएमएल बससेवेचा वापर केला आहे. संपामुळे दैनंदिन संचलना पेक्षा 100 जादा बसेस संचलनात आणल्या होत्या. तसेच सोमवारी तिकीट विक्रीतून 1 कोटी 92 लाख 8 हजार 968 रुपये तर . तर पास विक्रीतून  12 लाख 62 हजार 775 रुपये एवढे उत्त्पन्न एका दिवसात मिळाले आहेत.

Chakan News : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे न काढण्याची मागणी

संपाचा आंदाज घेत प्रशासनाने ऐनवेळी शंभर जादा बसेस देत पुणे – पिंपरी चिंचवड शहरात मिळून अशा 1 हजार 740 बसेस मार्गावर धावल्या. (Pune News) वेळेची गरज पाहता दोन्ही शहराच्या हद्दी बाहेरील बसेस बंद करून त्या शहरांतर्गत मार्गावर वळवल्या. यावेळी नागरिकांनी ही प्रशासनाकडे बसचा अनुभव उत्तम असल्याचा प्रतिक्रिया दिल्या. मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशी, विद्यार्थी यांना वेळेवर बसचा आधार मिळाला व ते वेळेत त्यांच्या इच्छीतस्थळी पोहचले.

यापुढेही प्रवाश्यांनी पीएमपीएमएल बसचा नागरिकांनी जास्तीत-जास्त वापर करावा असे आवाहान नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.