Bye-Election : भाजपचे उमेदवार आज जाहीर होणार; सोमवारी अर्ज भरणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज –  पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Bye-Election) आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील.  सोमवारी सकाळी 11 वाजता कसबा मतदारसंघाचा आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज 1 वाजता भरला जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आता भाजपचे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक घेतली.  अर्ज भरण्याची मुदत चार दिवसांवर आली. तरी अद्यापही भाजप किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले नाहीत. त्यामुळे उमेदवार कोण असतील याची उत्सुक्ता ताणली आहे.

Alandi News : बालविवाहप्रकरणी वधु-वर व साक्षिदारांवार गुन्हा दाखल

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, येत्या 6 तारखेला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करू, अजून पर्यंत कोणाचे ही नाव (Bye-Election) निश्चित झालेले नाही, मात्र आज रात्री उशिरा नावे जाहीर होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.