Pune: शहरात कोरोनाचे 243 रुग्ण तर जिल्ह्यात 284 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 243 झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या 284 झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

पुणे शहरात रविवार 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील तीन रुग्णाचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 243 झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनाबाधित 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 189 झाली आहे.

पुण्यातील 243 रुग्ण, पिंपरी-चिंचवडमधील 30 तर ग्रामीण भागातील 11 रुग्ण असे मिळून पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 284 असल्याचे महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.