Pune : भवानी, कसबा पेठ, ढोले पाटील रोड परिसरात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग रात्रंदिवस युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, ढोले पाटील रोड परिसरात रुग्ण काही कमी होत नाही. दिवसागणिक त्यामध्ये वाढच होत आहे. पुणे शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 772 झाली आहे. 

भवानी पेठेत कोरोनाचे सर्वाधिक 171, कसबा – विश्रामबागवाडा 111, ढोले पाटील रोड 110 रुग्ण आढळले आहेत. ही संख्या सातत्याने वाढतीच आहे. पुणे शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 772 झाली आहे. कोरोनामुळे बळींची संख्या 56 च्या वर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे संपूर्ण शहर सील केले आहे. पोलिसांनी नागरिकांना बाहेर निघण्यास अटकाव केला आहे.

शहरातील येरवडा 82, शिवाजीनगर – घोलेरोड 77, धनकवडी 43, बिबवेवाडी 24, वानवडी 34, हडपसर 26, नगररोड 18, कोंढवा 12, वारजे – कर्वेनगर 9, सिंहगड रोड 9, औंध – बाणेर 2, कोथरूड – बावधन 1 असे कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, प्रशासनाने आता कडक अंमलबजावणी सुरू केल्याने काही तासच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

तर, कोथरूड – बावधन, औंध – बाणेर परिसरात कोरोना आटोक्यात आहे. या भागातील सोसायट्यांनी अनेक उपाययोजना सुरुवातीपासूनच केल्या आहेत. त्यामुळेच या भागात कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.