Pune Corona Update: सर्वाधिक 1416 नवे रुग्ण, 746 जणांना डिस्चार्ज, 15 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 1416 new patients, 746 discharged, 15 dead एका दिवसात 6 हजार 343 कोरोना चाचण्या

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या बुधवारी 6 हजार 343 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये आजपर्यंत सर्वाधिक 1416 रुग्ण आढळले. 746 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 15 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात आतापर्यंत 30 हजार 523 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर, 19 हजार 570 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 10 हजार 64 सक्रिय रुग्ण आहेत. 502 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 76 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आजपर्यंत या रोगामुळे 889 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

शनिवार पेठेतील 84 वर्षीय पुरुषाचा, बाणेर मधील 49 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील, 78 वर्षीय महिलेचा, मुंढव्यातील 69 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 80 वर्षीय पुरुषाचा,  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 55 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 61 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 61 वर्षीय महिलेचा, मार्केटयार्डमधील 74 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 59 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, वडगावमधील 32 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 53 वर्षीय महिलेचा AIMS हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 62 वर्षीय पुरुषाचा, शुक्रवार पेठेतील 55 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोना चाचण्यांत पुणे अव्वल – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे शहरात आज एकाच दिवसात 4015 स्वॅब टेस्ट आणि 2,328 रॅपिड टेस्ट अशा एकूण 6,343 टेस्ट घेण्यात आल्या. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या आता 1 लाख 78 हजार 115 इतकी झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. गेल्या आठवडाभरात आपण 30 हजार 555 इतक्या टेस्ट केल्या असून जिल्ह्याची मिळून ही संख्या 46 हजार 718 इतकी होते. या आकडेवारीचा राज्यपातळीवर विचार करता आपण मुंबई आणि ठाण्याला मागे टाकले आहे, असेही महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.