Pune corona update: शहरात आज 53 नवीन रुग्णांची नोंद तर 83 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज: – पुणे शहराच्या विविध भागातील 53 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी ) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आज शहरात कोरोनाने 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत शहरातील 9 हजार 109  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 7 हजार 728 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 758 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. या सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आज 4486जणांची टेस्ट करण्यात आली त्यातील 53 जणांची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.