Maharashtra Corona Update : नागपूरनंतर लातूरमध्ये सापडला ओमायक्रॉनचा रुग्ण

एमपीसी न्यूज – नव्यानं आलेल्या ओमायक्रॉन या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या आता 20 इतकी झाली आहे. नागपूरात रविवारी एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर आज (दि.13) लातूरमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड 10, पुणे 1, कल्याण डोंबिवली 1, मुंबई 5 आणि आता नागपूर आणि लातूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे.

महाराष्ट्रात आज (सोमवारी) दिवसभरात 569 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 498 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 441 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 64 लाख 93 हजार 002 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्या 74 हजार 190 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 887 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 69 लाख 58 हजार 681 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.