Pune Corona Update : सावधान…पुणे शहरात नवे 400 रुग्ण ; 360 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 400 रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली आहे. आज 360 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 544 इतकी आल्यामुळे संसर्ग दर स्थिर आहे. विशेष म्हणजे दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आत्तापर्यंत 1 लाख 59 हजार 789 करोनातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामधील एकूण 409 रुग्णांची स्थिती गंभीर असून 245 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

तरीही नागरीकांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.