Pune: गल्लीबोळात फिरतोय कोरोनारुपी यम, पुणेकरांना करतोय घरात बसण्याचं आवाहन

Pune: Corona Yama walking in the streets, appealing to the people of Pune to stay at home in lockdown स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गल्लीबोळात फिरून या यमाने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले.

एमपीसी न्यूज- पुणे शहराच्या अनेक भागात सध्या कोरोनारुपी यम आपल्या रेड्यासोबत फिरताना दिसतो आहे. पुणेकरांना हा यम घरात बसण्याचे आवाहन करतोय. नागरिकांनी घरातच बसावं, नाही तर तुम्हाला माझ्या सोबत यावं लागेल असं सांगत हा यम पुणेकरांना लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. स्वारगेट पोलिसांनी हा उपक्रम राबवला होता.

सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु, असं असलं तरीही अनेक नागरिक घराबाहेर फिरताना दिसून येतात. मागील तीन दिवसांपासून अशा नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे.

नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचं पालन करावं यासाठी स्वारगेट पोलिसांनी हा उपक्रम राबवला होता. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गल्लीबोळात फिरून या यमाने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाविषयी माहिती देताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले, नागरिकांना लॉकडाऊनच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं यासाठी हा उपक्रम होता.

अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. कुठेतरी त्यांच्या मनात कोरोनाची भीती राहावी यासाठी हा उपक्रम होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.