Pune Crime: कुख्यात गुंड शरद मोहोळ तडीपार

कोथरूड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज: कुख्यात गुंड शरद मोहोळ याला कोथरूड पोलिसांनी तडीपार केले आहे. घातक व जिवघेण्या हत्यारासह खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, दहशत निर्माण करणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे मोहोळ याने आपल्या साथीदारांसह केलेले आहेत. (Pune Crime) पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुंड शरद मोहोळ याला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरूध्द आरोपीने न्यायालयात आपील केल्यानंतर त्याला जामीन मंजुर करण्यात आला होता.मात्र मुक्तता झाल्यावर लगेचच त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले.

Vanrai Pune: “ग्रामीण-पर्यावरणपूरक जीवनशैलीचा” पुणेकर घेणार अनुभव

शरद मोहोळ याची समाजातील भिती व हिंसा कमी करून त्याच्या या बेकायदेशीर कारवायांना पायबंद घालणे गरजेचे आहे तसेच आगामी निवडणुकीच्या कालावधीत त्याच्याकडून एखादा गंभीर गुन्हा घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गुंडाला तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. (Pune Crime) या आदेशानुसार पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हयातून 6महिन्यासाठी या गुंडाला तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.