Pimpri Corona Update: शहरात आज 237 नवीन रुग्णांची नोंद; 118 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहराच्या विविध भागातील 237 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 63 हजार 49 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 358 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 290 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 68 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 466  नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 60 हजार 435 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.