Chikhali Crime : कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याने केला महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : चिखलीमध्ये (Chikhali Crime) कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण साळवे (वय 28 वर्षे, रा. विठ्ठलनगर) असे आरोपीचे नाव आहे.

Moshi : कालपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला

आरोपी हा कचऱ्याच्या गाडीवर कामाला असताना फिर्यादी यांना “तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे.” असे बोलून फिर्यादीशी जवळीक साधून जेव्हा फिर्यादी त्याच्या गाडीत शेजारी बसल्या तेव्हा फिर्यादी यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच, चल आपण लॉजला जाऊ असे बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केला. आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 354, 354(अ) अन्वये गुन्हा (Chikhali Crime) दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.