Pune Crime News : अट्टल वाहन चोराला केली अटक; १३ मोटार सायकली केल्या जप्त

एमपीसी न्यूज – पुणे, मुंबई, सांगली, नगर,नागपूर येथून वाहन चोरणार्या एकास पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या १३ मोटार सायकली जप्त केल्या.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी – पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या सहाकडील पथकाला चंदननगर पोलीस ठाण्याच्या वाहन चोरीच्या आरोपीची माहिती मिळाली होती त्यानंतर तो गुन्हा शहर पोलीसांच्या युनिट सहाकडे वर्ग करण्यात आला.त्यानंतर पोलीसांनी कारवाई करीत पुणे नगर महामार्गावरील खुळेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर सापळा रचून मोन्या ऊर्फ विनोद आनंद कांबळे (वय ३०,रा.हिराबाई झोपडपट्टी,लांडगे चाळ, पिंपळे गुरव,पुणे) याला ताब्यात घेतले.

पोलीसांनी त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती विनोद याने चोरल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी त्याला अटक करुन न्यायालयालासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक जूनपर्यंत पोली कोठडी दिली होती.

 

पोलीस कोठडीत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता विनोद याने पुणे शहर, मुंबई, सांगली, नगर आणि नागपूर येथून त्याच्या एका साथीदारासह चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या १३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.आत्तापर्यंत विनोद याच्याविरोधात पुण्यात ९ गुन्हे, मुंबईत १, नागपूर १, सांगली १, नगर १ असे १३ वाहन चोरीचे गुन्हे दाखक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.