Pune Crime News : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी अटकेत

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसीन्यूज : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून कोयते, चाकू, मिरचीपूड असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

साहिल दिलीप सांबरे (वय २० रा. पर्वती), सोमेश्वर भानुदास गायकवाड (वय २०, रा. जनता वसाहत), कृष्णा कुमार चव्हाण (वय २१) , सूरज जांबरे (वय २१), तेजस पवार (रा. पर्वती दर्शन ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सिंहगड रस्त्यावर असलेल्या गायत्री ज्वेलर्समध्ये टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून साहिल, सोमेश्वर, भानूदास, कृष्णा, तेजस, सूरजला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, चाकू, मिरचीपूड मिळून आली.

चौकशीत त्यांनी गायत्री ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.