Pune Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण , प्रियकर अटकेत

एमपीसी न्यूज-लग्न करण्यासाठी प्रेयसीचे अपहरण ( Pune Crime News ) करून लग्न न केल्यास तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पुण्यातील स्वारगेट परिसरातील जेधे चौकातून या तरुणीच्या अपहरण करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीच्या प्रियकरासह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

सोमनाथ सुनील सुळ (वय 25) आणि गणेश बापूराव महानवर (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुण्यातील बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Crime News : नवले पुलावरून 24 वर्षीय तरुणीचाआत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी सोमनाथ सूळ यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र आरोपी हा रागीट असल्यामुळे दोघांचे पटत नव्हते. त्यांच्यात सतत वाद होत होते. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी चार चाकी गाडीतून फिर्यादी तरुणीचे अपहरण केले.

( Pune Crime News ) त्यानंतर तिला वाघोली जेजुरी आणि सदाशिव पेठेत घेऊन जात सोमनाथ सूळ याच्यासोबत लग्न न केल्यास तिला आणि तिच्या घरच्यांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली. दरम्यान पीडित तरुणीने आपली सुटका करून घेत पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.