Pune Crime News : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – मागील अनेक महिन्यांपासून फरार असणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्या पत्नीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संगीता रवींद्र बऱ्हाटे (वय 55) असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी रवींद्र बऱ्हाटे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तयार करण्यासााठी मदत करणाऱ्या पितांबर दिवार याला देखील अटक करण्यात आली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात रवींद्र बराटे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या कारणावरून तसेच फरार असणाऱ्या रवींद्र बऱ्हाटे याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यामुळे संगीता बऱ्हाटे हिला अटक करण्यात आली आहे.

रवींद्र बऱ्हाटे याने फरार असताना काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. यामध्ये त्यांनी आपणही सर्व कशा पद्धतीने केले याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी पितांबर दिवार यांनी मदत केल्याचे समोर आल्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान रवींद्र बराटे आणि त्याच्या टोळीवर विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. महारुद्र चतुशृंगी, हडपसर, कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बराटे टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र बराटे फरार आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर महसूल विभागाने त्याची मालमत्ता देखील जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.