Pune Crime : पुण्यात सिगारेट आणि पाण्याच्या बाटलीवरून दोन गटात तुफान हाणामारी

एमपीसी न्यूज : पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (Pune Crime) परिसरात सिगारेट आणि पाण्याच्या बाटली वरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. हा सर्व प्रकार जहांगीर हॉस्पिटल समोरील मंजूर पान शॉप या ठिकाणी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.

नौशाद शेख, हुसेन खान, वसीम सय्यद आणि कासिम शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, याप्रकरणी स्वप्निल दत्तू कांबळे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी नौशाद याचे पान शॉप आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी स्वप्निल कांबळे हा मित्रासह त्याच्या पान टपरीवर गेला होता. यावेळी सिगारेट आणि पाण्याची बाटली घेण्यावरून दोघात वाद झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. दरम्यान याच प्रकरणात वसीम हाजी मलंग सय्यद यांनी देखील बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार स्वप्निल कांबळे निलेश धनगर आणि कुमार कोळी यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

Pravin Tarde : शालेय वयातच ध्येय निश्चित करावे – प्रवीण तरडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.